
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे
बृहन महाराष्ट्र कॉलेजऑफ कॉमर्स, पुणे -४
केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठीची मट्रीकोत्तर (Post Matric) शिष्यवृत्ती योजना सन २०१७ – १८
राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी व जैन या अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत (Post Matric) शिष्यवृत्ती योजना राज्यामध्ये सन २०१७ – १८ साठी ऑनलाईन पद्धतीने शासनामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे नवीन शिष्यवृत्ती (Fresh) व शिष्यवृत्तीचे नुतनीकरण (Renewal) करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जाणार असून कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
सोबत मा.संचालक तथा नोडल ऑफिसर, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे – १ यांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात जोडलेली आहे. शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी खालील संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेचे पालन करून User Id तयार करून online अर्ज भरावा.
www.scholarships.gov.in
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यात दर्शविण्यात आलेली सर्व कागदपत्रे स्कन करून ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या जागी अपलोड करणे आवश्यक आहे.
शासनाने विहित केलेल्या मुदतीत जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणार नाहीत त्यांना केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक मॅट्रीकोत्तर (Post Matric) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. तरी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावे याची नोंद घ्यावी.
प्राचार्य
दिनांक : २२/०७/२०१७
http://www.dhepune.gov.in/scholarship/PMS.htm
http://sppudocs.unipune.ac.in/sites/circulars/Scholarships%20Circulars/Forms/AllItems.aspx