Sept 28 2017

Post Matric Scholarship for disability students Notice 17-18
Mr. nilesh owhal sir

डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे

बृहन महाराष्ट्र कॉलेजऑफ कॉमर्स, पुणे -४

केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागामार्फत अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २०१७ – १८

 

केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागामार्फत अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करण्यासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सदर योजना राज्यामध्ये सन २०१७ – १८ साठी Online पध्दतीने शासना मार्फत राबविण्यात येत आहे.विद्यार्थ्यांना नवीन शिष्यवृत्ती ( Fresh ) व शिष्यवृत्ती नुतनीकरण ( Renewal)करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने शासना मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. फक्त ऑनलाईन (Online ) पध्दतीने भरलेले अर्जच स्वीकारले जाणार असून कोणत्याही परिस्थितीत (Offline) पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

          सोबत मा. सहसंचालक  (उच्च शिक्षण ), महाराष्ट्रराज्य, पुणे – १ यांनी प्रसिध्द केलेली जाहिरात जोडत आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्रविद्यार्थ्यानी खालील संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेचे पालन करून user id तयारकरून Online अर्ज भरावा.

www.scholarships.gov.in

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यात दर्शविण्यात आलेली सर्व कागदपत्रे स्कन करून ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्याजागी अपलोड करणे आवश्यक आहे.

शासनाने विहित केलेल्या मुदतीत जे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणार नाहीत त्यांना केंद्र शासनाच्या विकलांगजनसशक्तीकरण विभागांतर्गत अपंग विद्यार्थ्यांना पोस्ट मट्रिकशिष्यवृत्ती योजनाचा लाभघेता येणार नाही. याची नोंद घ्यावी.

 

 

  प्राचार्य

दिनांक : २८/०७/२०१७

 

Downloads :
Please read the PDF file (.pdf).