Sept 26 2016

SC OBC VJNT SBC Scholarship & Freeship Notice 2016-17
Mr. nilesh owhal sir

डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे

बृहन्महाराष्ट्र कॉलेजऑफ कॉमर्स, पुणे – ४

शिष्यवृत्ती सूचना

 

शैक्षणिक वर्ष २०१६ –२०१७ या वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या संवर्गातून महाविद्यालयात प्रवेश घेतलेलाआहे त्या विद्यार्थ्यांनी शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील शिष्यवृत्ती किंवाफ्रीशिप चा ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. हा ऑनलाईन शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपअर्ज

https://mahaeschol.maharashtra.gov.in

for SC, OBC, VJ, NT-A,B,C,D & SBC Categories

या वेबसाईट वर उपलब्धआहे. शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप चा ऑनलाईन अर्ज भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रेजोडून महाविद्यालयात कार्यालयात श्री. ओव्हाळ यांच्याकडे  स.१०.३० ते ०१.३० या वेळेत दिनांक ३० सप्टेंबर,२०१६ पर्यत जमा करावेत.

नवीन अर्ज भरणाऱ्याविद्यार्थ्यांकरिता: (इ. ११ वी, एफ.वाय बी.कॉम., एम.कॉम.भाग १ व जे पहिल्यांदा शिष्यवृत्ती किंवाफ्रीशिपअर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी)

१. विद्यार्थ्याने https://mahaeschol.maharashtra.gov.in या पोर्टल Open केल्यावर  Home Page दिसेल, या HomePage वर New Student Registration वर क्लिककरून Postmatric student ला क्लिक करून पुढे सर्व फिल्ड चीसर्व माहिती विद्यार्थ्यांनी अचूक भरावी. ऑनलाईन पूर्ण भरल्यावर युजर नेम व पासवर्ड मिळेल.

२. युजरनेम व पासवर्ड  टाकून लॉगीनकेल्यानंतर शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपअर्ज भरावा. अर्ज भरताना विशेष

    काळजी  घ्याजसे बी.कॉम.१ म्हणजे एफ.वाय.बी.कॉम., बी.कॉम.२म्हणजे एस.वाय. बी. कॉम.

      ३. माहिती भरताना सोबत ठेवायची व शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप च्या अर्जासोबतद्यावयाची कागदपत्रे:


१.   १० वी/ १२ वी / बी.कॉम. ची मार्क शिट 

२.    विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे मार्कशिट    

३.    विद्यार्थ्याचा जातीचा दाखला 

४.    पालकांचा (तहसीलदाराने दिलेला)उत्पनाचादाखला (सन २०१५- २०१६)

५.    महाविद्यालयाची चालू वर्षाची प्रवेशपावती

६.    विद्यार्थ्याचे आधार कार्ड

७.    पासपोर्ट आकाराचा विद्यार्थ्याचाफोटो

८.    विद्यार्थ्याच्या बँक पासबुक(नाव,फोटो,खाते क्र.एम.आय.सी आर. क्रमांक 

  व आय.एफ.एस.सी. क्रमांक नमूद असलेले)

     ९. विद्यार्थ्याचा शिक्षणात खंड  असेलतर (Gap Certificate) खंड दाखला

 

४. ऑनलाईन शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपअर्ज भरल्यानंतर सोबत वरील सर्व कागदपत्रेजोडून महाविद्यालयाच्या कार्यालयात विहित मुदतीत जमा करावेत.

अर्ज नूतनीकरण:

  १. या आधी शिष्यवृत्तीचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती किंवाफ्रीशिपचा अर्ज नूतनीकरण करण्यासाठी अर्ज भरण्याची आवश्यता नाही.

२.   अर्ज नूतनीकरण करण्याकरता विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे कार्यालयात जमाकरावयाची आहे.

१.   १० वी/ १२ वी / बी.कॉम. ची मार्क शिट 

२.   विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे मार्कशिट    

३.    विद्यार्थ्याचा जातीचा दाखला 

४.    पालकांचा (तहसीलदाराने दिलेला)उत्पनाचा दाखला (सन २०१५-२०१६)

५.    महाविद्यालयाची चालू वर्षाची प्रवेशपावती

६.    विद्यार्थ्याचे आधार कार्ड

७.    पासपोर्ट आकाराचा विद्यार्थ्याचाफोटा

८.    विद्यार्थ्याच्या बँक पासबुक(नाव,फोटो,खाते क्र.एम.आय.सी

  आर. क्रमांक व आय.एफ.एस.सी. क्रमांकनमूद असलेले)


९. विद्यार्थ्याचा शिक्षणात खंड  असेल तर (Gap Certificate) खंड दाखला

 

दिनांक: २५ ऑगस्ट, २०१६                              प्राचार्य