Feb 24 2018

राज्य शासनाची बारावीनंतर च्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यव
Nilesh Owhal Schoarship Dept

डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे

बृहन महाराष्ट्र कॉलेजऑफ कॉमर्स, पुणे -४

राज्य शासनाचीबारावीनंतर च्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीशिष्यवृत्ती योजना  २०१७ – १८

 

राज्यातीलमुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील गुणवानविद्यार्थ्यांसाठी राज्य शासन पुरस्कृत अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनाराज्यामध्ये  सन २०१७ – १८ साठी ऑनलाईनपद्धतीने शासनामार्फत mahadbt मार्फत राबविण्यात आली होती . सदर पोर्टलवर तांत्रिकअडचणी निर्माण झाल्याने हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरून घेण्यात येत आहेत. ज्याविद्यार्थ्यांनी mahadbt वर ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी वउर्वरित अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर अर्ज हा www.dhepune.gov.in या वेबसाईटवर वमहाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

 

            अल्पसंख्याकशिष्यवृत्तीचा विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून योग्य ती कागदपत्रे जोडून दिनांक २८फेब्रुवारी, २०१८ पर्यत महाविद्यालयाच्या कार्यालयात श्री. ओव्हाळ यांचेकडेसकाळी १०.३० ते १.३० या वेळेत जमा करावे. अपूर्ण व अर्धवट भरलेल्या अर्जाचा विचारकेला जाणार नाही. सदर अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील.

 

नवीन मंजुरीच्याअर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१.     विद्यार्थ्याचा पासपोर्टआकाराचे छायाचित्र (फोटो)

२.      विद्यार्थ्याचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व त्यापुढील परीक्षांमधीलप्राप्त केलेले गुण दर्शविणाऱ्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती.

३.      सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला / फोर्म नं. १६ / स्वयंरोजगारअसलेल्या पालकांचे उत्पन्नाबाबतचे स्वयमप्रमाणित प्रमाणपत्र

४.      अल्पसंख्याक असल्याबाबतचे स्वयमप्रमाणित प्रमाणपत्र

५.      कायम निवासाच्या पत्त्यासंबंधी पुरावा –शिधापत्रिका / वीजबिल/ टेलिफोन बिल/निवडणूक ओळख पत्र/ पासपोर्ट यापैकी एक

६.      विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी लिंक असलेले बँक खाते पासबुक

७.     आधार कार्ड

 

शिष्यवृत्तीचे नुतनीकरण(Renewal)

१.     सक्षम अधिकाऱ्यानेदिलेला उत्पन्नाचा दाखला / फोर्म नं. १६ / स्वयंरोजगार असलेल्या पालकांचेउत्पन्नाबाबतचे स्वयमप्रमाणित प्रमाणपत्र

२.      मागील वर्षाची गुणपत्रिका

३.      विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी लिंक असलेले बँक खाते पासबुक

४.     आधार कार्ड

 दिनांक : १५ फेब्रुवारी, २०१८                                                                             प्राचार्य

Downloads :
राज्य शासनाची बारावीनंतर च्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यव (.pdf).