12 13 2018

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti Scheme Notice 18-19
Mr.owhal

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे

बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे- ४

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना २०१८-१९

(वरिष्ठ महाविद्यालय)

 

ज्याविद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये खुल्या संवर्गातून या महाविद्यालयप्रवेश घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातीलविद्यार्थ्यानी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना२०१८-१९ चा अर्ज शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरावा. शासनाची वेबसाईट पुढीलप्रमाणेआहे -   https://mahadbtmahait.gov.in

यावेबसाईट ऑनलाईन भरणे सुरु आहे. तरी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप चा ऑनलाईन अर्ज भरून दि. २० जानेवारी ,२०१९ पूर्वी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत महाविद्यालयात कार्यालयात श्री. ओव्हाळ यांच्याकडे जमा करावेत. विहित मुदतीत अर्जप्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील, याचीकृपया नोंद घ्यावी.

 

1) ऑनलाईनअर्ज भरताना विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डला मोबाईल नंबर वविद्यार्थ्याचे बँक खाते  लिंक असणे आवश्यकआहे.

2) ऑनलाईनअर्ज भरताना आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल वर OTP येतो तो Verifiedकरावा. 

3) खालीलशिष्यवृत्ती/ फ्रीशिप चा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याने mahadbtmahait.gov.in यावेबसाईटवर लोगिन करून त्यातील Profile मधील सहा टॅब (Personal Information, Address Information, OtherInformation, Current Course, Past Qualification, Hostel Details) व्यवस्थित भरणे आवश्यक आहे.

4)Profile पूर्ण भरून झाल्यावर Scheme निवडताना Director of Higher Education क्लिक करून Rajarshi Chhatrapati Shahu MaharajShishyavrutti Scheme निवडावी.

पात्रता: 1) अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

2)  अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवात्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे

3)  शासन निर्णयानुसार प्रथम दोन मुले या योजनेसाठीपात्र आहेत.

4)  सदर योजना बिगर आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्याविद्यार्थ्यांना लागू राहील.

5)  अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभघेतलेला नसावा.

6)  अर्जदाराने प्रत्येक सत्र अथवा वर्षाची परीक्षा देणेबंधनकारक आहे.

नूतनीकरण: मागीलवर्षी सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठीअर्ज करू शकतात.

 आवश्यक कागदपत्रे:-

1) सक्षमप्रधिकाऱ्याने दिलेला अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

2)शैक्षणिक वर्षाच्या लगतपुर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसीलदार अथवा सक्षमअधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( Income Certificate)

3) दोनमुलांचे कुटुंब घोषणापत्र

4) विद्यार्थ्याची गुणपत्रिका झेरॉक्स (१० वी, १२वी,  बी कॉम-१,२,३,  एम कॉम भाग-१ )

 

दि:०१/१/२०१९                                                                           प्राचार्य