Feb 07 2018

भारत सरकार मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजना –सन २०१७-१८
Nilesh Owhal Schoarship Dept

 


डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे

बृहन्महाराष्ट्र कॉलेजऑफ कॉमर्स, पुणे – ४

भारत सरकार मट्रिकोत्तरशिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजना –सन २०१७-१८

 

शासन निर्णय क्र.इ.बी.सी.- २०१७/ प्र.क्र. ५२४ / शिक्षण-१, दिनांक २९ जानेवारी २०१८ नुसारमहाडीबीटी या पोर्टलवर विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ लागण्याने शासनाने सदरभारत सरकार मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजना सन२०१७-१८ साठी मागील वर्षाची शिष्यवृत्ती पध्दतीचा अवलंब करण्यास  सांगितला आहे .

 

ज्याविद्यार्थ्यांनी  शैक्षणिक वर्ष २०१७-१८ यावर्षात ज्या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्याजमाती व विशेष मागास प्रवर्ग या संवर्गातून महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्याविद्यार्थ्यांनी शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप चाऑफलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. हा ऑफलाईन शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप अर्जमहाविद्यालयाच्या वेबसाईटवर (www.bmcc.ac.in) उपलब्ध आहे. शिष्यवृत्ती किंवाफ्रीशिप चा अर्ज भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून महाविद्यालयाच्याकार्यालयात श्री. ओव्हाळ यांच्याकडे स.१०.३० ते ०१.३० या वेळेत दिनांक १४ फेब्रुवारी, २०१८ पर्यत  जमा करावेत. अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणारनाहीत. सदर अर्ज विहित मुदतीत भरण्याचीजबाबदारी विद्यार्थ्याची राहील .

 

नवीन अर्ज भरणाऱ्याविद्यार्थ्यांकरिता: इ. ११ वी, एफ.वायबी.कॉम., एम.कॉम.भाग १ व जे पहिल्यांदा ऑफलाईन शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपअर्जभरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑफ लाईन अर्ज भरून तात्काळ महाविद्यालयात आवश्यक तीकागदपत्रे जोडून जमा करावीत

 

अर्ज नूतनीकरण : इ. १२ वी, एस.वाय बी.कॉम.,  टी.वायबी.कॉम. व एम.कॉम.भाग -२ च्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा ऑफलाईन शिष्यवृत्तीकिंवा फ्रीशिपअर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑफ लाईन अर्ज भरून तात्काळमहाविद्यालयात आवश्यक ती कागदपत्रे जोडून जमा करावीत

 

 शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप च्या अर्जासोबतद्यावयाची कागदपत्रे:

१.       मार्क शिट  (१० वी , १२ वी, एफ वाय बी.कॉम. टी वाय.बी.कॉम.)

२.       विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे मार्कशिट    

३.       विद्यार्थ्याचा जातीचा दाखला 

४.       पालकांचा उत्पनाचा दाखला (तहसीलदाराने दिलेला सन २०१६- २०१७)

५.      रहिवास प्रमाणपत्र ( फक्त नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी)

६.       महाविद्यालयाची चालू वर्षाची प्रवेशपावती

७.       विद्यार्थ्याचे आधार कार्ड

८.       पासपोर्ट आकाराचा विद्यार्थ्याचा फोटो

९.       विद्यार्थ्याच्या बँक पासबुक(नाव,फोटो,खाते क्र.एम.आय.सी आर. क्रमांक व आय.एफ.एस.सी. क्रमांक नमूद     असलेले)

१०.  बँकेकडून आधार संलग्न झाल्याचे स्लीप / पोहोच पावती

११. विहित नमुन्यातील बंधपत्र (Indemnity Bond)

१२.  विद्यार्थ्याचा शिक्षणात खंड  असेल तर(Gap Certificate) खंड दाखला

 

 

 

दिनांक: ०५ फेब्रुवारी, २०१८                                                                               प्राचार्यDownloads :
Download the for Scholarship freeship form 17-18 (.doc).